एमीबीएच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

0

जळगाव : – एमबीएचे शिक्षणासाठी मध्यप्रदेशातून जळगावात आलेल्या सौरभ विकास कोल्हे (वय २३, मूळ रा. दाभियाखेडा, मध्यप्रदेश, ह.मु. गंधर्व कॉलनी) या तरुणाने मित्रांसोबत राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील दाभियाखेडा येथील रहिवासी असलेला सौरभ कोल्हे याने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पुर्ण केले होते. त्यानंतर तो एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी मध्यप्रदेशातून जळगावात आला होता. जळगावातील गंधर्व कॉलनीमध्ये एका भाडेतत्वावरील खोलीमध्ये राहून एमबीएच्या शिक्षणासाठी तयारी करत होता. गुरुवारी संध्याकाळी सर्व मित्र खोलीबाहेर बसलेले असताना सौरभ खोलीत गेला. त्याने मागील खोलीमध्ये जावून गळफास घेतला. | रात्री साडेनऊ वाजता त्याचे मित्र जेवणासाठी

बोलवण्यासाठी गेले असता, त्यांना सौरभ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्या वेळी त्यांना मोठा धक्का बसला. या विषयी त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना व पोलिसांना माहिती दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले मयत घोषीत

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सौरभला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत सौरभव याला मयत घोषित केले.

सौरभ हा अभ्यासात हुशार असल्यानेत्या चा नियमीत अभ्यास होता. तसेच तो कुठल्याही तणावात देखील नव्हता. परंतू त्याने आत्महत्येसारख्या टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबियांसह मित्रांना देखील धक्का बसला आहे. मयत सौरभचे आई-वडील शेतकरी असून मध्यप्रदेशातील दाभियाखेडा येथे राहून ते शेती करतात. त्याला एक लहान भाऊ असून तो गावाकडेच राहतो.

Leave A Reply

Your email address will not be published.