चौथ्या लाटेबाबत भारतातही व्यक्त होत आहे चिंता

0

गौरव हरताळे, लोकशाही न्युज नेटवर्क

चीन व पाश्चिमात्य देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाची स्थिती आणि तेथे नव्याने तयार झालेल्या व्हेरिएंटमुळे भारतात देखील कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

चीनसोबतच पाश्चिमात्य देशामध्ये कोरोना महामारीचा आलेख पुन्हा वाढतांना आपल्याला दिसत आहे. त्यात कोरोनाच्या नव्याने तयार झालेल्या बी ए २ व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये अजून भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे.

हा व्हेरिएंट जरी नवीन असला तरी यावर लसीचा परिणाम योग्य तोच होतो आहे. यात फक्त एवढीच बाब समोर आलेली आहे की, हा व्हेरिएंट ओमिक्रोन सारखा लवकर निदर्शनात येण्यासारखा नाही. जसे ओमिक्रोनचे आरटीपीसीआर चाचणीत निदान होते. त्यापध्दतीचा बी ए २ व्हेरिएंट नाही. याची लागण झालेली आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला genome sequencing टेस्ट करावी लागते. त्यानंतर आपल्याला कळते की आपल्याला याची लागण झालेली आहे. हा व्हेरिएंट ओमिक्रोन पेक्षा सहजपणे लोकांमध्ये संक्रमित करतो.

वाइरोलॉजिस्ट डॉ. टी जैकब जॉन यांनी माध्यमासोबत बोलताना यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, या बाबतीत कुठल्याही प्रकारचे वैज्ञानिक, महामारी विज्ञान किंवा बायोलॉजिकल कारण नाही आहे की ज्यामुळे आपण कोरोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज लावू शकतो. पण कोणीही याबाबत ही भविष्यवाणी नाही करू शकत की चौथी लाट येऊ शकत नाही.

सध्य परिस्थितीबाबत आपण हे बोलू शकतो की, कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आपल्याला यावर लक्ष ठेवून असायला पाहिजे. आपल्याला सतर्क राहिले पाहिजे. लोकांमध्ये भय निर्माण करणे हि चिंतेची बाब आहे. ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या गणितीय संकल्पनेवर आपण कोणत्याही नव्याने येणाऱ्या कोरोना लाटेची भविष्यवाणी करू शकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.