ब्रेकिंग : महिलेच्या मृतदेहावरही बलात्कार

0

लोकशाही न्युज नेटवर्क
नागपूर – जिल्ह्यातील खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी कापूस वेचणाऱ्या एका महिलेचा मृतदेह शेतात बेवारस अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाच्या अवस्थेवरूनच तिचा खून झाल्याचे स्पष्ट होत असल्याने खापा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
या प्रकरणात संशयित तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्या महिलेवर या तिघांनी बळजबरीने सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या केली. डोक्यात सैतान संचारल्याने ऐवढ्यावरच ते तिघे थांबले नाहीत तर हत्या केल्यानंतरही या महिलेवर त्यांनी बलात्कार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही घटना उघडकीस आल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील खापा पोलिस ठाण्यांतर्गत सुरेवानी गावात मृत महिला एकटी शेतात कापूस वेचत होती. त्यावेळी तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिघांना ताब्यात घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.