पायलट निलंबित; लघुशंका प्रकरणी ३० लाखांचा दंड

0

लोकशाही न्युज नेटवर्क
नवी दिल्ली – २६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या विमानात लघुशंका घटनेबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर मोठी कारवाई केली आहे. DGCA ने कठोर कारवाई करत एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतकेच नाही तर डीजीसीएने पायलटचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. याबरोबरच एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांना ३ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिला प्रवाशासमोर अश्लील कृत्य आणि लघवी केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मिश्रा हा अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी आरोपीला ७ जानेवारी रोजी बेंगळुरू येथून अटक केली होती. शंकर मिश्रा याने दारूच्या नशेत महिलेसोबत हे घाणेरडे कृत्य केले होते.
एअर इंडियाने लघुशंका करण्याच्या या घाणेरड्या प्रकराबाबत आरोपी शंकर मिश्रा यांच्यावर ४ महिन्यांसाठी विमान प्रवासाची बंदीही घातली आहे. यानुसार शंकर मिश्रा हा चार महिने एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवास करू शकणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.