रस्त्यावर पडलेली मातीच्या ढिगाऱ्यामुळे चालकाचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गिधाडे येथील तापी नदीच्या पुलाजवळ पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून तीनचाकी मालवाहू रिक्षा उलटून चालक ठार झाला. हा अपघात ५ डिसेंबरला दुपारी साडेतीनला घडला.

मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पुलाजवळ वारंवार अपघात होत असूनही संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम मानवी बळी जाण्यात झाल्याच्या प्रतिक्रिया वाहनचालकांतून देण्यात आल्या.

शरद मंगल पाटील (वय ३५, रा. पिंपळकोठा, ता. धरणगाव, जि. जळगाव) असे मृत चालकाचे नाव आहे. तो सध्या सुरत येथे राहत होता. तो तीनचाकी मालवाहू रिक्षा (एमएच १९, जीएच ८४८२) ने शिंदखेड्याकडून शिरपूरकडे येत होता. तापी नदीवरील पूल ओलांडल्यावर गिधाडे गावाजवळ रस्त्यावर पडलेल्या माईच्या ढिगाऱ्यावरून रिक्षाचे चाक गेले.

त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. अपघातात शरद पाटील गंभीर जखमी झाला. त्याला दुसऱ्या वाहनचालकाने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिसांनी अपघाताची नोंद केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.