सुवर्णसंधी ! पोस्टात बंपर भरती, तब्बल 81 हजार पगार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

तुमचेही सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आता दहावी शिकलेल्यांसाठी पोस्टात बम्पर भरती निघाली आहे. इंडिया पोस्ट ऑफिसमार्फत 1899 पदांसाठी भरती सुरू केली आहे.

इंडिया पोस्टने इंडिया पोस्ट एमटीएस रिक्रूटमेंट 2023 अधिसूचना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये क्रीडा कोट्यासाठी मेल गार्ड, पोस्टमन, एमटीएस आणि इतर पदांसाठी 1899 जागांसाठी बम्पर ओपनिंग आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजीपासून यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2023 आहे.

यात ग्राम डाक सेवक (GDS) शाखा पोस्ट मेन (BPM), सहाय्यक शाखा पोस्ट मेन (ABPM), पोस्टमन, वर्गीकरण सहाय्यक, पोस्टल सहाय्यक इत्यादी पदं आहेत. भारतीय पोस्ट ऑफिस 2023 भरतीसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना भत्त्यांसह मासिक देयकं दिली जातील.

पदाचे नाव आणि वेतनमान

पोस्टल सहाय्यक (स्तर 4) 25,500 – 81,100 रु.

सहाय्यक वर्गीकरण (स्तर 4) 25,500 – 81,100 रु.

पोस्टमन स्तर (स्तर 3) 21,700 – 69,100 रु.

मेल गार्ड स्तर (स्तर 3) 21,700 – 69,100 रु.

मल्टी टास्किंग स्टाफ स्तर (स्तर 1) 18,000 – 56,900 रु.

 

वयोमर्यादा

पोस्टल सहाय्यक 18 वर्षे- 27 वर्षे

सहाय्यक वर्गीकरण 18 वर्षे- 27 वर्षे

पोस्टमन 18 वर्षे- 27 वर्षे

मेल गार्ड 18 वर्षे- 27 वर्षे

मल्टी टास्किंग स्टाफ 18 वर्षे- 25 वर्षे

 

निवड प्रक्रिया 

लेखी चाचण्या, कौशल्य चाचणी, मुलाखत, दस्तऐवज पडताळणी

 

असा करा अर्ज 

अधिकृत वेबसाइट http://indiapost.gov.in ला भेट द्या

मुख्यपृष्ठावरील ‘रिक्रूटमेंट्स’ वर क्लिक करा.

संबंधित जाहिरात निवडा आणि त्यातून जा.

अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

पेमेंट करा आणि अर्जाचे पुनरावलोकन करा.

प्रिंट करा.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.