राज्यात पुढील 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात गेल्या दोन दिवसात बऱ्याच जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. उन्हाच्या प्रचंड झळांनी लोक बेजार झाले आहेत. राज्यात पुढील तीन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे.

‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

राज्यातील काही भागात तापमानाचा पारा प्रचंड वाढत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा चटका वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांत काही भागात उष्णतेचा चटका वाढला आहे.

पुढील पाच दिवस येथे उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.