मंदीराचा लाईट न लावल्याने एकाच्या डोक्यात लोखंडी पट्टीने मारले

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

मंदिराचा लाईट सुरु न झाल्याच्या कारणावरून एकाने लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून दुखापत केल्याची घटना निमखेडी शिवारातील महादेव मंदिर परिसरात २ मे रोजी सायंकाळी घडली . याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, हर्षवर्धनकॉलनी परिसरात राहणारे दिलीप रामदास शिंपी वय ६६ हे मजुरी करीत आपला उदरनिर्वाह करीत असून २ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी लक्ष्मण बंडू मराठे रा. हर्षवर्धन कॉलनी याने फिर्यादी दिलीप शिंपी यांना मंदिराचा लाईट सुरु न झाल्याने मंदिराची अशी कशी इलेकट्रीक फिटिंग केली असा जाब विचारून फिर्यादीला मंदिर आवारात पडलेल्या लोखंडी पट्टीने डोक्यात डाव्या बाजूला मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण मराठे याच्याविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास गुलाब नामदेव माळी करीत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.