आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात युवा टीम इंडिया नेपाळ सोबत भिडणार… बघा संपूर्ण वेळापत्रक…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. सोमवारी मलेशियाने थायलंडचा 194 धावांनी पराभव करत गट फेरी संपवली. यासह ग्रुप स्टेजनंतर उपांत्यपूर्व फेरीतील आठही संघ निश्चित झाले आहेत. भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशांनी आधीच चांगल्या क्रमवारीच्या आधारे अंतिम 8 मध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. तसेच, आता उपांत्यपूर्व फेरीत होणाऱ्या चारही सामन्यांचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे.

नेपाळ, हाँगकाँग आणि मलेशिया यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ३ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानचे संघ आपापले सामने खेळतील. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान 4 ऑक्टोबरला अॅक्शन करताना दिसणार आहेत. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने 6 ऑक्टोबर रोजी आणि अंतिम सामना 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे सर्व सामने हांगझोऊ येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट मैदानावर खेळवले जात आहेत.

उपांत्यपूर्व फेरीचे पूर्ण वेळापत्रक ;

भारत विरुद्ध नेपाळ, ३ ऑक्टोबर (भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३०)

पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग, 3 ऑक्टोबर (भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30)

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, ४ ऑक्टोबर (भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३०)

बांगलादेश विरुद्ध मलेशिया, 4 ऑक्टोबर (भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30)

भारतीय संघ

 

रुतुराज गायकवाड (कर्णधार), मुकेश कुमार, आकाशदीप, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अरशदीप सिंग आवेश खान.

 

नेपाळ संघ

 

रोहित कुमार पौडेल (कर्णधार), संदीप जोरा, कुशल भुर्तेल, प्रतिस जीसी, बिबेक यादव, दीपेंद्र सिंग आयरे, कुशल मल्ला (यष्टीरक्षक), विनोद भंडारी (यष्टीरक्षक), आसिफ शेख (यष्टीरक्षक), गुलशन कुमार झा, ललित राजबंशी, करण केसी , सोमपाल कामी, संदीप लामिछाने, अभिनाश बोहरा.

Leave A Reply

Your email address will not be published.