टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू संघाच्या बाहेर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वर्ल्ड कपमध्ये येणाऱ्या रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी मोठी बातमी आली आहे. ही बातमी टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याबाबत आहे. तो अजून दुखापतीतून बरा झाला नाही, आणि त्यामुळे वर्ल्ड कपचे पुढील दोन तो खेळणार नाही. पांड्या रविवारी इंग्लंड आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संघाचा भाग असणार नाही. पंड्या थेट ५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर नेदर्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन साखळी संन्यासाठीच उपलब्ध असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यांदरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे त्याने गोलंदाजी केलेली नाही. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये पांड्याला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी काही दिवस थांबावे लागले.

कधी होणार संघात सामील?
पांड्या मुंबई किंवा कोलकाता येथे भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे. भारतीय संधी व्यवस्थापन पांड्याच्या पुनरागमनासाठी घाई करणार नसल्याचे समजत आहे. शेवटच्या दोन साखळी सामन्यांसाठी तो पूर्णपणे बरा होईल, अशी आशा संघाला आहे. या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ विजयी मार्गावर आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला उपांत्य फेरीसाठी पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त हवा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.