रजनीकांत स्टारर ‘जेलर’ चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रजनीकांत स्टारर ‘जेलर’ चित्रपटामध्ये व्हिलनची भूमिका साकारणाऱ्या अभनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. विनायक असं या अभिनेत्याचे नाव आहे. त्याने जेलर चित्रपटामध्ये वर्मनची भूमिका साकारली होती. विनायकने एर्नाकुलम टाऊन नॉर्थ पोलिस स्टेशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. त्यामुळे केरळ पोलिसांनी विनायकला अटक केली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विनायकने त्याच्या अपार्टमेंटमध्ये गोंधळ घातला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावले होते. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे विनायक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पण तो दारूच्या नशेत होता. त्याने पोलिस स्टेशमध्ये गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विनायकनला वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विनायकनला रुग्णालयामध्ये नेत असताना त्याने माध्यमांना सांगितले की, ‘पोलिसांनी मला का अटक केली माहिती नाही. मी तर तक्रार दाखल करण्यासाठी आलो होतो. तुम्ही पोलिसांना विचारा की ते मला रुग्णालयात का घेऊन जात आहेत?’

 

Leave A Reply

Your email address will not be published.