तलाठी पदासाठी होणार ४ हजार १२२ पदांसाठी भरती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी भरतीच्या तब्बल 4122 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि भरती परीक्षेसाठी नेमकी कोणती कागदपत्रं लागणार त्याची घेऊया माहिती.

भरले जाणारे पद

तलाठी (जिल्हानिहाय)

एकूण पदे – 4122

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

तलाठी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मराठी, हिंदी आणि (Talathi Bharti 2023) इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे.
SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय मर्यादेत शिथिलता देण्यात येणार आहे. (Talathi Bharti 2023)

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे –

10वी / SSC गुण पत्रक
स्कॅन केलेला फोटो
शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, हस्तांतरण प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र इ.)
स्वतःचा E – Mail ID आणि फोन नंबर (Talathi Bharti 2023)
जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल तर)
नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (गरज असल्यास)
अपंगत्व प्रमाणपत्र (तुम्हाला कोणतेही अपंगत्व असल्यास)
जन्मतारीख प्रमाणपत्र
स्वतःची स्कॅन केलेली स्वाक्षरी

Leave A Reply

Your email address will not be published.