खाद्यसंस्कृती : स्विट कॉर्न थालीपीठ

0

लोकशाही विशेष लेख 

पाऊस आणि गरमा गरम भजी आणि चहा मस्त कॉम्बिनेशन आहे ना. पावसाची सुरवात झालीयेच आता, मग करुयात एखादा गरमागरम पदार्थ. मी नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन प्रयोग केलेल्या आणि थोड्या वेगळ्या प्रकाराच्या रेसीपी घेऊन येत असते, तसेच आज आपण भजीच्या ऐवजी थालीपीठ करणार आहोत. तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं? पण थालीपीठ थोडं वेगळंच आहे बरका! चला तर मग पाऊस आणि थालीपीठाचा आस्वाद घेण्यासाठी तयारीला लागूयात.

 

साहित्य :

२ वाटी स्विट कॉर्न (मक्याचे दाणे), छोटा तुकडा आलं,६/७ पाकळ्या लसूण, ३/४ हिरवी मिरची, २ चमचे बेसन, १/२ चमचा जीरे, १/२ चमचा ओवा, १ बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चिमूटभर हळद, मीठ  चवीनुसार, तेल

 

कृती :

 

१) मक्याचे दाणे स्वच्छ धुवून त्यामध्ये आलं, लसूण, मिरची घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.

 

२) तयार झालेल्या वाटणात बेसन, जिरे, ओवा, कांदा, हळद, मीठ, आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

 

३) तयार बॅटर १० मिनिटे झाकून ठेवून द्यावे.

 

४) तयार झालेले बॅटरचे तव्यावर चमच्याने पसरवून थालीपीठ करुन घ्यावे. व गरमागरम थालीपीठ दही, पुदिना चटणी किंवा सॉससोबत खायला द्या.

 

चवीला छान लागतेच आणि अगदी झटपट व सोपी अशी रेसिपी तुम्हीसुध्दा बनवून पावसात थालीपीठाचा आस्वाद नक्की घ्या.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे.

९८९२१३८१३२

पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.