स्वाती मालीवाल यांना कारमधून ओढत नेणाऱ्याला अटक

0

लोकशाही न्युज नेटवर्क
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कारमधून ओढत नेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
https://twitter.com/ANI/status/1615992366535700481/photo/1
बुधवारी रात्री उशिरा एका कार चालकाने त्यांना 10-15 मीटरपर्यंत ओढत नेले . कार चालकाने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले असता त्यांनी प्रतिकार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी स्वाती मालीवाल यांची लेखी तक्रार घेऊन आरोपी हरीश चंद्र (वय, 47) याला अटक केली. त्याची कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपी संगम विहार येथील रहिवासी आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे 3.11 वाजता घडली. एम्सच्या गेट क्रमांक दोनसमोर कार चालकाने स्वाती मालीवाल यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. मालीवाल तिला खडसावत असताना कारचालक हरिश्चंद्रने कारची विंडशील्ड वर केली. यामुळे स्वाती मालीवाल यांचा हात गाडीत अडकला. यानंतर कार चालकाने त्यांना 10 ते 14 मीटरपर्यंत ओढले

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.