स्व . निखिलभाऊ खडसेंच्या स्मरणार्थ पाणपोईचे उदघाटन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्व . निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या स्मरणार्थ अयोध्या नगर गणपती मंदिर याठिकाणी पाणपोईचे उदघाटन जेडीसीसी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्याहस्ते करण्यात आले.

अनंत झांबरे यांच्या स्वखर्चाने व प्रयत्नाने अयोध्या नगर या परिसरातील नागरिकांना व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उन्हाळ्यात थंड पाण्याची व्यवस्था स्व . निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या स्मरणार्थ करून दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, जिल्हा महानगर अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, मा. उपमहापौर सुनिलभाऊ खडके, जिल्हा महानगर सरचिटणीस सुनिलभैय्या माळी, जळगाव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख लिलाधरभाऊ तायडे यांची उपस्थित होती.

यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अनंत झांबरे, हेमंत महाजन, वैभव सावदेकर, अविनाश वाणी, गणेश पाटील, राम पांडे यांनी परिश्रम घेतले.

अनंत झांबरे यांनी स्वखर्चाने पाणपोई चालू केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.