‘ताली’ मधून हि अभिनेत्री साकारणार तृतीयपंथीयाची भूमिका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

गौरी सावंत (Gauri Sawant) हे नाव आज घर घरात पोहचला आहे. ‘विक्स’ कंपनीच्या जाहिरातीतून एक तृतीयपंथी समोर आली. एका तृतीयपंथीयाच्या आयुष्याचा संघर्ष, त्यांचं म्हणणं या जाहिरातीतून जगासमोर आलं आणि गौरी सावंत हे नाव घराघरात पोहोचलं. त्यानंतर गौरीने भोगलेलं दुःख, तिचा संघर्ष, कुटुंबाकडून झालेली अवहेलना, वेळप्रसंगी करावा लागणारा वेश्याव्यवसाय हे सारंच जगासमोर आलं. आज हाच संघर्ष वेब सिरिजच्या माध्यमातून समोर येणार आहे.

”ताली” (Taali) असं या वेबन सिरिजचे नाव असून मराठी दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) ही वेब सिरिज दिग्दर्शित करणार आहे. तर अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen), गौरी सावंतची म्हणजे तृतीयपंथीयांची भूमिका साकारणार आहे. आज वर्ल्ड ट्रान्सजेंडर व्हिजिबलिटी दिवस.. तृतीयपंथिय समाजासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. त्यात सुश्मिता  लवकरच ‘ताली’ मधून गौरी सावंत या तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. म्हणून थेट गौरी सावंत सोबत सुश्मिताने एक व्हिडिओ शेयर करत लोकांना चांगला संदेश दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.