श्रीराम रथउत्सवाची जय्यत तयारी सुरु

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

350 वर्षाची एतिहासिक परंपरा लाभलेल्या भडगाव नगरीचे अराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या रामराज्य रथ उत्सवाची गेल्या दोन दिवसापासुन सुरू असून दि.1 एप्रिल (कामदा एकादशी) रोजी दुपारी तीन वाजता भव्य रामराज्य रथ उत्सवाची सुरुवात होणार आहे. यासाठी बाजार चौकातील श्रीराम मंदिरा समोर रथाची सफसफाई, फुलांची सजावट, सजीव देखावे, इ जय्यत तयारी सुरू आहे. प्रभू श्रीराम यांच्या रथात श्रीराम, सीता माता, लक्ष्मण, यांच्या मूर्ती तसेच रथा सोबत रथाचे सारथी, हनुमान, वानर, पाच बाहुले, दोन घोडे, दोन शिपाई, दोन राक्षस अश्या लाकडाच्या मूर्ती रथामध्ये असतात. रथ मिरवणुकीत विशेष आकर्षण म्हणजे चार वेगवेगळ्या ट्रॅक्टर मध्ये प्रभू श्रीराम यांची 14 फुटी मूर्ती, पवन पुत्र हनुमान यांची 11 फुटी मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, व पारंपरिक अंगत यांची मूर्ती यांचे विशेष आकर्षण असणार आहे.

दुपारी तीन वाजता निघणाऱ्या रथ उत्सवात चार बॅडं, दोन डि.जे., ढोल ताशा पथक, व रथ मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी असे अनेक नियोजन सुरु आहे. तसेच येणाऱ्या काळात रथाच्या दुरुस्ती साठी निधी संकलनाचे काम हे गुढीपाडावा पासून सुरु असून निधी संकलनाचे काम 350 स्वयंसेवक यांनी घरोघरी जाऊन निधी संकलन केले आहे यामधे 3000 पेक्षा जास्त कुटुंबीयांनी आर्थिक सहभाग नोंदविला आहे. तसेच अजून कोणाला निधी स्वरूपात देणगी द्यायची असल्यास रथ उत्सव समिती यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दुपारी तीन वाजता निघणाऱ्या भव्य रामराज्य रथउत्सवात सर्व श्रीराम भक्तांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.