इतिहासात अशी निवडणूक झाली नव्हती !

निवडणुकीतील गैरप्रकारांवर सुळेंची टीका

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

आजवर राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात अशी निवडणूक झाली नव्हती. ग्रामीण महाराष्ट्रात पैशांचे वाटप, धाकदपटशा असे प्रकार झाले तर मुंबई आणि आसपासच्या शहरात संथ मतदान आणि गैरसोयी पाहायला मिळाल्या, एका सशक्त लोकशाहीसाठी हा प्रकार अतिशय घातक असल्याची चिंता खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. पुणे अपघाताच्या घटनेत कुणाच्या राजकीय दबावामुळे संबंधित मुलाला जामीन मिळाला. राजकीय दबावाला बळी पडू नका, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस नेमके कुणाबद्दल बोलत होते, हे त्यांनी राज्याला सांगावे असे आव्हान त्यांनी दिले. तसेच हे सर्व होत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार कुठे आहेत, असाही प्रश्न त्यांनी विचारला.

राज्यातील निवडणुकीचे पाचही टप्पे पार पडले असून, त्याविषयी आणि अन्य विषयांवर सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी राज्यातील निवडणुक ज्याप्रकारे घेण्यात आली त्याविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सुळे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर आणि अहमदनगर या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले आहेत. यासंदर्भात मी स्वतः बारामती मधील 143 तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. मतदानाच्या एक दिवस आधी रात्री अनेक परिसरातील कॅमेरे बंद करण्यात आले होते, असे सुळे म्हणाल्या.

ग्रामीण महाराष्ट्रात पैशाचे वाटप, दमदाटी असे प्रकार घडले तर मुंबईसारख्या शहरात मतदान करण्यासाठी दोन ते तीन तास लागले, हे धक्कादायक आहे. एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे, असेही सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे. राज्यातील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने होते. त्यामुळे निकालाच्या दिवशी सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा विश्वासही सुळे यांनी व्यक्त केला.

राजकीय दबाव नेमका कुणाचा ?

पुणे अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी फोन केला होता. वकील तिथे कोणी पाठवला, त्या आरोपीला इतक्या पटकन बेल कशी मिळाली, या सगळ्याची उत्तरे राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले पाहिजेत. सुळे म्हणाल्या की, पुणे अपघाताच्या घटनेत कुणाच्या राजकीय दबावामुळे संबंधित मुलाला जामीन मिळाला. राजकीय दबावाला बळी पडू नका असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस नेमके कुणाबद्दल बोलत होते? हे त्यांनी राज्याला सांगावे. त्याचबरोबर राजकीय दबाव हा सत्ताधारी पक्ष टाकू शकतो

Leave A Reply

Your email address will not be published.