बापरे! वऱ्हाड्यांची बस अचानक पेटली, उरला फक्त सांगडा

चहाच्या तल्लफने वाचवला जीव

0

बुलढाणा, लोकशाही न्युज नेटवर्क

आयुष्याची दोरी पक्की असेल मनुष्य अनेक मोठ मोठ्या आघातातून वाचतो. अशीच घटना विदर्भात घडली आहे. चंद्रपूर येथून वऱ्हाड घेऊन येणारी खाजगी बस अचानक पेटली मात्र ४८ प्रवाश्यांचे प्राण वाचले ! चहाची तल्लफ भागविण्यासाठी खाली उतरल्याने त्यांचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली नजीकच्या मेहकर फाट्यावर आज मंगळवारी आज सकाळी हा घटनाक्रम झाला. वऱ्हाडी मंडळी चंद्रपूर येथून बुलढाणा येथे ट्रॅव्हल्स बसने लग्न आटोपून येत होते. पहाटे मेहकर फाट्यावर खासगी बस चहा पाण्यासाठी थांबली. यावेळी काही प्रवासी गाढ झोपेत होते. मात्र बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात येताच बसमध्ये एकच गदारोळ होऊन सर्व प्रवासी जागी झाले. जीव वाचविण्यासाठी खाली उतरण्यासाठी बसमधील प्रवाश्यांची एकच धावपळ उडाली. प्रवाशी खाली उतरताच काही वेळातच खाजगी बस उभी पेटली. काही क्षणात या बसचा कोळसा झाला आणि केवळ सांगडाच उरला.

प्रवासी बालबाल बचावले असले तरी त्यांच्या बॅग आणि मौल्यवान दागिने मात्र जळून खाक झाले आहेत. तसेच खाजगी बसचे मोठे नुकसान झाले.

या घटनेची माहिती चिखली पोलीस, चिखली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी भीषण आग आटोक्यात आणली. खाजगी बस बुलडाणा येथील पवार यांच्या मालकीची असल्याचे समजते. मात्र याची अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.