32 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  

यावल तालुक्यातील दहिगाव येथील 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.

याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दहिगाव येथील शरीफ तुरा पटेल उर्फ आलिफ पटेल (वय 32) याने राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपवली.

मयताच्या पश्चात पत्नी, आई, दोन भाऊ, दोन मुली असा परिवार आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पुढील तपास हवालदार संजय देवरे, राजेंद्र पवार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.