धक्कादायक; “बरं झाल मेला…RIP” स्टेट्स ठेवत तरुणाची आत्महत्या…

0

 

दौंड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका तरुणाने स्टेटस ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. “एक दिवस सगळ्यांच्या स्टेट्सला माझा फोटो असणार आणि कॅप्शन असणार RIP (बरा झाला मेला)” असं स्टेट्स ठेवून 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारस दौंड तालुक्यातील केडगाव मधील संकेत प्रकाश लोणकर (23) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

संकेत लोणकर याने आत्महत्या करण्यापूर्वी पहाटे 3 वाजून 32 मिनिटांनी गळफास घेण्याचे प्रतिकात्मक व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन आत्महत्या केली. एक दिवस सगळ्यांच्या स्टेट्सला माझा फोटो असणार आणि कॅप्शन असणार RIP (बरा झाला मेला) असं स्टेट्स संकेतने व्हॉट्सअपवर ठेवलं होतं. सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी स्टेट्स पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. रुमचा दरवाज तोडला असता संकेतचा मृतदेह आढळून आला.

आत्महत्येमागे सेक्सटॉर्शन प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांमधून व्यक्त करण्यात आला आहे. संकेतने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.