सावकाराच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

सावकाराकडून पैसे घेतले असल्याने ते परत मिळावे यासाठी सावकाराचा सातत्याने तगादा लावून धरला होता. सावकाराच्या जाचाला कंटाळून ३३ वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना धुळ्यात घडली आहे. यानंतर शिक्षकाचे नातेवाईक आक्रमक झाले अजून पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

आनंदा रतन चव्हाण (वय ३३) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शिक्षकाचे नाव आहे. आनंदा चव्हाण यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. हे पैसे परत घेण्यासाठी सावकाराचा तगादा सुरु होता. सावकारांनी पैशांसाठी संबंधित युवा शिक्षकास त्रास दिल्यामुळेच शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा नातेवाईकांचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

नातेवाईकांचा रास्ता रोको
युवा शिक्षकाच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ व नातेवाईक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. संबंधित सावकारांस जोपर्यंत पोलीस ताब्यात घेऊन कठोरात कठोर शिक्षा करत नाही. तोपर्यंत निजामपूर पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यावर संतप्त नातेवाईक ठाम होते. तसेच निजामपूर पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केला असून, पोलीस प्रशासनातर्फे मृताच्या नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.