केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये इन्टप्रिनर डे

0

जळगाव ;- के सी ई चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या उद्योजकता विभागामार्फत आज पदवीस्तरावरील विद्यार्थांसाठी उद्योजकता दिवस आणि त्यानिमित्ताने बिझनेस प्लॅन आणि प्राॅडक्ट डिस्प्ले स्पर्धा ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी की नोट स्पिकर आणि परीक्षक म्हणुन प्रसिद्ध उद्योजक नेचर टुर्सचे समीर देशमुख आणि माजी विद्यार्थिनी तसेत उद्योजिका अपुर्वा वाणी उपस्थित होत्या.

प्रस्तावना करतांना डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे “काॅलेजमधील इन्क्युबेशन सेंटरचा फायदा घ्या.. आयडिया जनरेशन समजवून घ्या.. गरजा ओळखून प्रॉडक्ट डिझाईन करा. सोशल मीडियाचा वापर नवीन आयडियांचा शोध घेण्यासाठी करा. तुमची इच्छाशक्ती तीव्र पाहिजे.
त्यानंतर बोलताना समीर देशमुख म्हणालेत “स्टार्ट अप मध्ये फेल्युअर आले तरी पेशन्स ठेवा. काॅन्फीडन्स तगडा ठेवायचा.. मारवाडी कम्युनीटी कडुन शिकण्यासारखे आहे ते डेड इन्वेस्ट्मेंट करत नाही. सुरवातीला मी एफ एम सीचे प्राॅडक्ट डिस्टीब्युशन केले होते. आता टुर अ‍ॅन्ड टुरिझम कडे वळलो. कस्टमस साॅयकाॅलाॅजी ओळखा. इतरांपेक्षा वेगळे काही ठरवा. एअरलाईन, हाॅटेलिंग, कल्चरल फेस्टीवल्स , फुड टुरिझम, वाईल्ड टुरिझम, अँडव्हेंचर टुरिझम, माईस टुरिझम (कार्पोरेट साठी), हेरीटेज टुरिझम, सोलो टुरिझम, ग्रुप टुरिझम,आँर्कालाँजी टुर्स, बाॅर्डर टाऊन टुरिझम असे असंख्य प्रकार आहेत. शिवाय इव्हेंट आणि वेडिंग याचीही नोंद घेतली पाहिजे. पुर्वी फक्त पारंपरिक पेलग्रीम टुरिझम व्हायचे. भारताचे मार्केट लास्ट मिनिट मार्केट आहे. आधी प्लॅनिंग खुप कमी लोक करतात. आता निघायचे आहे म्हणुन येणारे भरपूर असतात. इथे टुरिझम मार्केट खुप मोठे आहे. तुम्ही आँप्शन शोधा. कपॅसिटी डेव्हलप करा. युरोप आणि अमेरिका मध्ये सरसगट क्रेडिट कार्ड वापरले जाते .पण भारताची इकोनाॅमीक ताकद जबरदस्त आहे. लोकांची खर्च करण्याची कपॅसिटी वाढली आहे. फायनान्शिअल फंडींग साठी..रेप्युटेशन हवे. रेशो लक्षात घ्या. रनींग कॅपीटल ठेवायला हवे. तुमच्याकडे एज आहे एनर्जी आहे त्याचा उपयोग करुन घ्या. आजच्या एन्ट्राप्रिनर डे च्या बरोबरीने आज असलेल्या टुरिझम डे निमित्ताने हे लक्षात ठेवा.

त्यानंतर बोलताना सौ अपुर्वा वाणी यांनी त्यांचा इलेक्टीक इंजिनिअरिंग ते व्यवसायिक सुत्रसंचालक हा आपला प्रवास उलगडुन दाखवला. पाण्याचा प्रवाह जसा पुढे नदीच्या प्रवाहात रुपांतरीत होतो, तसाच उद्योजकांचा प्रवास हवा कुठे थांबायचे आहे, कुठे पुढे जायचे आहे. कुठे बदलायचे आहे.. ते समजायला हवे . नवीन व्यवसायात चुका होणार पण त्यावर मात करुन पुढे जाता आले पाहिजे. आज आपण माहिती तंत्रज्ञान युगाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. आज जे नाॅलेज मिळणार आहे.. त्याचाच उपयोग यापुढे करावा लागणार आहे. नाॅलेज युग सुरु होणार आहे. जगात सर्वत्र मंदीची लाट असताना भारत जगांच्या अर्थव्यवस्थेत तग घरून आहे. योग्य वेळेला आलेली संधी तुम्ही ग्राॅब केली नाही तर दुसरा कोणी घेऊन जाईल. जे शिकला तर अँप्लाय करता आले नाही तर तुमच्या ज्ञानाला अर्थ नाही.

बिझनेस प्लॅन आणि प्राॅडक्ट डिस्प्ले काॅम्पिटीशनचा निकाल खालील प्रमाणे प्रथम बक्षीस १५००रु अर्वा बोहरा, खुशबु इंदानी, अपुर्वा कोळी, आकांक्षा लाठी, तर द्वितीय १०००रु वेदांत चालसे, जयदेव नेहेते, कोमल मौर्य तर तृतीय ७५० रु मुस्कान आहुजा आणि नेतल वर्मा यांनी जिंकले
यावेळी व्यासपीठावर डिन डॉ तनुजा फेगडे, डॉ शमा सराफ, इव्हेंट कोआॅरडिनेटर जयश्री चौधरी आणि नेहा ललवाणी तसेच सभागृहात डॉ अनुपमा चौधरी, डॉ ममता दहाड, डॉ निशांत धुगे, डॉ पराग नारखेडे, डॉ स्वप्निल काटे, डॉ योगेश पाटील आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आभार इव्हेंट कोआॅरडिनेटर प्रा जयश्री चौधरी यांनी मानले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.