ग्रामीण भागातील शिक्षक-विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना मिळतेय दाद

0

जामनेर तालुक्यातील विद्यालयाची जळगावात चित्रप्रदर्शनी

जळगाव;- जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील नि.पं.पाटील विद्यालयतर्फे गणेश उत्सवनिमित्त विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मेहनतीने तयार केलेल्या कल्पक कलाकृतींना नागरिकांकडून दाद मिळत आहे. हे प्रदर्शन ३० सप्टेंबरपर्यंत रिंगरोडवरील गाडगीळ चित्रप्रदर्शनीत सुरु असून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी यावे असे आवाहन पाटील विद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

अजिंठा आर्ट सोसायटी जळगाव व नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे (मि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन दि शेंदुर्णी संस्थेचे सचिव सतिष काशिद यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड उपस्थित होते. संदिप पोतदार, शाळेचे मुख्याध्यापक बी..एस.निकम, पर्यवेक्षक व्ही.आर.पाटील हे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. सतिष काशिद यांनी मनोगत व्यक्त करतांना, कलेची जोपासना आणि कलेमध्ये करिअर करा असे सांगितले. तसेच ग्रामीण भागातील चित्रकला प्रदर्शन बघुन त्यांनी कौतुक केले. तसेच संजयराव गरुड यांनी चित्रकलेमध्ये विविध शैलीचे चित्राचे कौतुक केले व कलेची जोपासना करावी असे आवर्जून सांगितले. टी.टी.इंगळे यांनी सुत्रसंचलन केले. तर आभार मनिष पाटील यांनी मानले.

चित्रप्रदर्शनात पेन्सील माध्यमाचे गणपतीचे आकर्षक ड्रॉईंग व पेंटींग, पोस्टर कलर माध्यमाचे पेंटींग तसेच निसर्गचित्र, वारली पेंटींग अशा विविध माध्यमाची व शैलीची एकुण ६० चित्रे आहेत. सदर चित्रकला प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असुन ३० सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध आहे. मिताली काळे, गायत्री भुरे, पुनम सुर्यवंशी, ईश्‍वर चौधरी, प्रतिक्षा पाटील, जयश्री घोडके, रीतु पाटील, रेणू पवार, जान्हवी हडप, जयश्री पिठोडे, जान्हवी खैरे, योजना चौधरी व माजी विद्यार्थ्यांचे प्रदर्शनीत चित्रे आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिवप्रसाद जोशी व डी.आर.चौधरी यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.