कासोदा येथील १३ वर्षीय बालक बेपत्ता

0

कासोदा, ता. एरंडोल : येथील शिवाजी नगरमधील राहणारा चेतन रावसाहेब पाटील ( वय १३) हा २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून गणपती विसर्जन असल्यामुळे घरातून कुणास काहीच न सांगता निघून गेला. त्याचा गावासह परिसरात शोध घेतला असता तो न आढळल्याने मुलाचे वडील रावसाहेब पाटील यांनी कासोदा पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याबाबत नोंद केली आहे. हा मुलगा कुणालाही दिसल्यास कासोदा पोलीस ठाण्याची संपर्क साधावा, असे आवाहन मुलाचे वडील रावसाहेब पाटील यांनी केले आहे. तपास सपोनि नारखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक प्रदीप ठाकूर, श्रीराम पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.