गणेश कॉलनीत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

गणेश कॉलनीतील रहिवासी व दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर सर्व जण झोपलेले असताना तन्मय गजेंद्र पाटील (१४) राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभ्यासाच्या ताणावातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

तन्मय हा गणेश कॉलनी परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. त्याचे वडील ॲड. गजेंद्र पाटील हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात होता. मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपले होते. वडील गजेंद्र पाटील हे रात्री लघुशंकेला उठले असता त्यांना तन्मय जागेवर दिसला नाही. त्यामुळे त्यांनी वरच्या खोलीत जावून पाहिले असता मुलाने गळफास छताला गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान मुलाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली. अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ संतोष सोनवणे करीत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.