एसटी – दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार…

0

 

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

एसटी बस आणि दुचाकीच्या समोरासमोरील अपघातात ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास टाकळी रोडवरील नागदेवता मंदिराजवळील वळणावर घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर एस टी आगारातील बस क्रमांक एम एच २० बी एल २६४८ ही पुण्याहून प्रवाशी घेऊन भुसावळ येथे येत होती. तर प्रदीप भारमल नाईक (३०) रा. खडकी तालुका जामनेर हा मोटर सायकल क्रमांक एम एच १९ डी यु ७८४० वर जामनेर येथून पहूरकडे जात होता. दरम्यान जामनेर टाकळी रस्त्यावर असलेल्या नागदेवता मंदिराजवळील वळणावर दोघं वाहन समोरासमोर आल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप नाईक हा जागीच ठार झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल नाईक यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मयताच्या पश्चात आई, वडील,१ मोठा भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.