१०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

लवकरच आता १०वी आणि १२वी च्या परीक्षा ह्या सुरु होणार आहे. बोर्डाच्या परीक्षा म्हटले म्हणजे विद्यार्थ्यांवर दडपण येत असते. आणि त्याच संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विध्यार्थ्यांना दहा मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. राज्यमंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐन वेळेस टाइम मिळत नसल्याने निर्णय घेण्यात आला आहे.

करून काळात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिकच वेळ, शाळेतच परीक्षा केंद्र अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. यंदा करून पूर्व काळानुसार परीक्षा घेतल्या जाणार असल्याने राज्य मंडळाने गेल्यावर्षीच्या साकळती रद्द केल्या. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रक्रारे रोखण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी प्रश्नपत्रिकेचे आकलन होण्यासाठी दिली जाणारी दहा मिनिटे रद्द करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. तसेच परीक्षे केंद्रांवर पूर्णवेळ बैठे पथक, विद्यार्थ्यांची झडती आदी उपाययोजना करण्यात आल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.