यावल पंचायत समितीच्या गटशिक्षााधिकारीपदी विश्वास धनके यांची नियुक्ती

0

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारीपदी विश्वनाथ धनके यांनी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनीपदभार घेतला आहे.  यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख हे ३१ जानेवारी रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झाल्यापासुन हे पद रिक्त होते. त्यांच्या ठीकाणी नवनियुक्त गट शिक्षणधिकारीपदाची सुत्रे देण्यात आली आहे. बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले दिले आहे . रिक्त झालेल्या गट शिक्षणधिकारी यांचे पदभार सांभाळणारे विश्वनाथ चवदस धनके यांच्या मागे शिक्षण विभागाच्या विविध क्षेत्रात प्रशासकीय सेवा बजावण्याचा दांडगा अनुभव आहे.

गटशिक्षणधिकारी विश्वनाथ धनके यांनी बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार, शाळेत नियमित उपस्थित राहुन अभ्यासक्रम वेळेत व व्यस्थिपणे पुर्ण करणे, विद्यार्थ्यांच्या उज्वल शैक्षणिक भविष्यासाठी प्रभावीपणे शासकीय योजनांची अमलबजावणी करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण शिस्त व नियमांचे पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले., यासाठी सेवानिवृत्त झालेले गट शिक्षणाधिकारी नईम शेख यांच्या पाऊलांवर पाऊल टाकत आपण सर्व शिक्षण विभागातील आपले सह कर्मचारी शिक्षक बांधवांना सोबत घेणार असल्याचे विश्र्वनाथ धनके यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.