‘भारतीय संघ’ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या नागपूर (Nagpur) मध्ये कसोटी सामने खेळले जात आहे. भारतीय संघाने (Indian team) नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माचे (Rohit Sharma) शतक, रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरी, अक्षर पटेलची (Akshar Patel) दमदार फलंदाजी आणि आर अश्विनची फिरकी, याच्या जोरावर भारताने पहिली कसोटीत एक डाव व १३२ धावांनी ही कसोटी जिंकली.
विजयाचा भारतीय संघाला आणि भारतीय खेळाडूंना आयसीसी कसोटी क्रमवारीत खूप मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ट्वेंटी-२० (Twenty-20), वन डे व कसोटी या तीनही फॉरमॅटमध्ये आता भारतीय संघ नंबर वन आहे आणि आशियातील संघाने असा पराक्रम करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

जगातील हा दुसरा संघ ठरला आहे.भारताचा फिरकीपटू आर अश्विन हा पुन्हा एकदा टॉप टेनमध्ये आला आहे आणि रवींद्र जडेजानेही मोठी झेप घेतली आहे. अश्विनने दुसऱ्या डावात ५-३७ अशी आणि पहिल्या डावात ३-४२ अशी कामगिरी केली. ३६ वर्षीय गोलंदाज कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स नंबर वन वर आहे. जडेजानेही नागपूर कसोटीत पहिल्या डावात ५-४७ अशी गोलंदाजी केली होती आणि दुसऱ्या डावात २-३४ अशी कामगिरी केली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नागपूर कसोटीत शतक झळकावले होते आणि तोही १०व्या क्रमांकावरून ८व्या क्रमांकावर आला आहे. रोहितने नागपूरमध्ये १२० धावांची खेळी केली होती. भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल हा सहा स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.