सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 20 हजार जागांची बंपर भरती

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. भारत सरकारच्या विविध विभागात तब्बल 20 हजार जागांची बंपर भरती होणार आहे.

भारत सरकारच्या मंत्रालये, विभाग, एजन्सी आणि संस्थांमध्ये गट A, B आणि C अंतर्गत 20000 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासंबंधित 17 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करून, अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या जागांसाठी पदवीधर उमेदवार ८ ऑक्टोबरपर्यंत यासाठी अर्ज करू शकतात.

मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर आणि 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27/30 वयोमर्यादा पूर्ण करणारे उमेदवार या पदांसांठी अर्ज करू शकतात. आयोगाच्या https://ssc.nic.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी SSC CGL अधिसूचना, 2022 ची PDF ही यामध्ये नमूद केलेल्या थेट लिंकवरून (https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_CGLE_17092022.pdf) डाउनलोड करता येणार आहे. या वेबसाइटवरून थेट एसएससी सीजीएल भर्ती 2022 चा अर्ज भरण्यासाठी पृष्ठावर जाता येईल.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – १७ सप्टेंबर, २०२२.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ ऑक्टोबर, २०२२.

वयोमर्यादा ही १८ ते ३२ वर्षे दरम्यान असावी.

या पदांसांठी पगार 76000 रु. ते 151100 रु. असणार आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया टियर 1 आणि टियर 2 परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.