सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज १५ हजार घरांचे लोकार्पण

0

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील कामगार लाभार्थ्यांसाठ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार २४ घरांचे लोकार्पण शुक्रवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

देशातील पहिलाच असंघटित कामगारांसाठीचा ह गृहप्रकल्प आहे. हा प्रकल्प ३६७ एकर जागेवर असून प्रकल्पामध्ये एकूण ८३३ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीत ३६ घरे आहेत. कचर उचलणारे, विडी कामगार, बांधकाम कामगार, वस्त्रोद्योग कामगार इत्याद असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठ ही घरकुले आहेत. हा देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून असंघटित क्षेत्रातील ३० हजार कामगारांच्या घरकुलाचे स्वप्न यामुळे साकार होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.