Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»सर्पदंशाने १३ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
    जळगाव

    सर्पदंशाने १३ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    १३ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पाळधी खुर्द ता. धरणगाव येथे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.  जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना रात्री ८. वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    करण राजू बारेला (वय १३, रा. वैजापूर ता.चोपडा ह. मु. पाळधी खुर्द ता.धरणगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील रहिवाशी राजू बारेला हे त्यांची दोन मुले आणि पत्नी सह धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावात राहतात. शेतमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात, राजू बारेला यांचा लहान मुलगा करण बारेला हा गुरूवार ३१ ऑगस्ट रोजी गावातील शेतात निंदणीच्या कामासाठी त्याच्या काकू सोबत गेलेला होता.

    दरम्यान दुपारी शेतात काम करत असतांना त्याच्या पायाला सापाने चावा घेतला. तो बेशुध्द पडल्याने शेतात काम करणाऱ्या मजूरांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रात्री ८ वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत करणच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

     

    jalgaon snakebite
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif