‘पप्पी दे पप्पी दे पारोला’ फेम स्मिता गोंदकरचे आहे ‘बलुचिस्तानशी’ संबंध !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘पप्पी दे पप्पी दे पारोला’ या गाण्यातून अभिनेत्री ‘स्मिता गोंदकर’ (Smita Gondkar) चर्चेत आली. तसेच आपण तिला मराठी ‘बिग बॉस’ मध्ये सुद्धा बघितले होते. आता सध्यातरी ती ‘बलोच’ (Baloch) या मराठी सिनेमाच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करतांना दिसणार आहे. बलोच हा सिनेमा पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यांना गुलामगिरी स्वीकारावी लागली. प्रवीण तरडे म्हंटले म्हणजे चित्रपटावर अफाट अशी मेहनत घेणार व्यक्तीमहत्व,’ प्रवीण तरडे’ (Pravin Tarde) आणि स्मिता गोंदकर हि जोडी आपल्याला एकत्र ह्या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहे.

त्याचबरोबर बलोच या सिनेमासाठी अभिनेत्री स्मिताने ऍक्शन सीन्स सुद्धा दिले आहे. त्यासाठी तिनेही प्रचंड मेहनत घेतली आहे. तलवारबाजी, लाठ्या, मर्दानी खेळ ती शिकली, एवढाच नाहीतर तिला हे सर्व शिकण्याची आवड सुद्धा आहे. एका मुलाखती तिने खुलासा केला आहे कि, तिचा बलुचिस्तानशी नाते जुळले आहे. तिचे पूर्वज हे हे बलुचिस्तानचे (Balochistan) आहे. ती म्हणाली, “आमची कुलदेवी हिंगुलंबिकामाताचं अजून तिथे मंदिर आहे. माझं मात्र आजपर्यंत तिथे जाणं झालेलं नाही. या सिनेमाच्या माध्यमातून जायचा योग येतो का बघुया.” ती पुढे म्हणाली,”मला कायम ऐतिहासिक भूमिका करायची इच्छा होती. अनेकदा मी काही दिग्दर्शकांसमोर सहजच ही गोष्ट बोलून गेले आहे. छोटीशी भूमिका करायचीही माझी तयारी होती. अचानक मला पूर्ण फिल्मच ऑफर झाली म्हणून मी खूप खूश आहे.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.