चाळीसगावात घरफोडी ; दीड लाखांचा ऐवज लांबविला

0

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील एका घरातूनअज्ञात चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लुटल्याची घटना संत रोहिदास सोसायटी कापड मिल समोर , भडगाव रोड येथे उघडकीस आली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, संत रोहिदास सोसायटी भडगाव रोड येथे राहणारे फोटोग्राफर सुनील बोरसे वय ५१ यांच्या घरातून अज्ञात चोरटयांनी ६ मे रोजी दुपारी ४ ते साडे सहा वाजे दरम्यान ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या , ७० हजार रुपयांचा सोन्याचा हार . ५ हजारांचा मोबाईल, ८ हजारांचा सॅमसंग मोबाईल, ५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले . त्यानुसार सुनील बोरसे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय सुहास आव्हाड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.