झुमवर भारतीय सिंधी संगमचा वधुवर मेळावा उत्साहात

0

लोकशाही न्युज नेटवर्क
भारतीय सिंधी संगमच्यावतीने दि २२ जानेवारी रोजी झुम ॲप वधुवर मेळावा उत्साहात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की सिंधी समाजाच्यावतीने प्रथमच वेळे सोबतच पैसांची ही बचत म्हणून आजच्या जगाशी तर्क संगत करीत भारतीय सिंधी संगमच्यावतीने झुम ॲप वर वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या नवीन उपक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांनी भरभरून प्रतिसाद दिला या वधुवर मेळाव्यात जवळपास १५० ते २०० युवक युवतीनी हजेरी लावत आप आपली ओळख करून दिली . या नवीन उपक्रमांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे विशेष बाब म्हणजे या झुम मेळाव्यात उच्च शिक्षित पासून मध्यम शिक्षित पर्यंत सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात युवक व युवतीं सहभागी झाले होते.

या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी संरक्षक डॉ, बंसीलाल दर्रा, कोटा रा,अध्यक्ष ओमप्रकाश अठवानी, लखनऊ पारस असरानी, मंडला
रा,उपाध्यक्ष अमरदास खट्टर, रायपुर, सुखदेव गिडवानी रा.महासचिव राजगोपाल खट्टर रा,महिला सचिव पूनम लखमानी, लखनऊ, रा.सलाहकार डॉ ,मनोहर लाहेजा, छत्तीसगढ़,हरीश गोलानी, उदयपुर, हीरल कवलानी, नोएडा प्रकाश वाधवा, रायपुर दीप्ति मूलचंदानी लखनऊ जगदीश शहदादपुरी, अहमदाबाद मीना शहदादपुरी जूम लिंक यांच्या सहकार्य प्राप्त झाले.

सतीश कुकरेजा, महाराष्ट् प्रमुख पाहुणे म्हणून सि ए,चेतन तारवानी रायपुर मनीषा तारवानी, रायपुरअखंड सिंधी सेवा फाउंडेशन चे रा.उपाध्यक्ष मुरली गुरदासानी, जळगांव भूमि कृपलानी, जयपुर जूम लिंक संचालन व फेसबुक लाइव कर्ता जयप्रकाश बेलानी, नागपुर राष्ट्रीय प्रसिद्ध प्रमुख अशोककुमार लालवानी, पारोळा यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी अनेकांनी भारतीय सिंधी संगम च्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊन कौतुक केले.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.