वरणगाव येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन

0

लोकशाही न्युज नेटवर्क
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता बस स्टँड चौकात प्रतीमा पूजनासह अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

हिंदुहृदयस्राट मराठी मनाचे मानबिंदू शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतीमा पूजन आणि अभिवादन कार्यक्रमाला सहकारमित्र चंद्रकांत बढे, भाजपाचे सुनील काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष अश्फाक काझी, शिवसेनेचे समाधान महाजन, विलास मुळे, सूभाष चौधरी, संतोष माळी, चंद्रशेखर झोपे, प्रदीप भंगाळे, शेख अखलाख, राम शेटे, सुखदेव धनगर, सुनील भोई, संजू कोळी, अशोक शर्मा, प्रवीण वाकोडे, नंदू खाराटे, संजू खराटे, सुरेश चौधरी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी जमील टेलर, युवक राष्ट्रवादी काँगेसचे वाय.आर.पाटील, प्रल्हाद माळी, महेद्र शर्मा, गोलू राणे, प्रतिभा तावडे, भाग्यश्री गायकवाड, योगिता सोनार, आबा सोनार, मोहसीन खान यांच्यासह वरणगाव शहरातील सर्व राजकीय पक्ष यांच्याकडून प्रतीमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले.

शिवभोजनवर खीरपुरीचे वाटप

हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज बस स्टँड चौकातील शिवभोजन केंद्रावर खीरपूरीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला वरणगाव शहरातील भारतीत जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राजकिय, सामाजिक पदाधिकारी, माजी नगरसेवक, विवीध समाजाचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष तसेच पत्रकार बांधव उपस्थित होतें. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा घोष केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.