जीपीएस स्कुलतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0

लोकशाही न्युज नेटवर्क
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथे नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपले भाव प्रकट केले. महापुरुषांच्या आयुष्यातून आपण आदर्श घेऊन त्यांच्या प्रमाणे समाज हितासाठी कार्य करावे असे प्रतिपादन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी यावेळी केले. शाळेतील शिक्षक सलमान शेख व सोनाली पाटील यांनीही या महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाला विक्रम पाटील गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सचिन पाटील तसेंच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.