चक्क गायीच्या पोटात ५५ किलो प्लास्टिकसह ‘या’ वस्तू..! (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गायीच्या पोटात तब्बल ५५ किलो प्लास्टिक बॅगसह आश्चर्यकारक वस्तू आढळून आल्यात. सुदैवाने डॉक्टरांनी गाईवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्या वस्तू बाहेर काढल्या असून उपचार सुरु आहे.

*युट्युब लिंक👇*

जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगरात एक गाय सुस्त पडून होती. यामुळे परिसरातील नागरिकांनी तिला जिल्हा पशु सर्वचिकित्सालय येथे दाखल केले. पशुसंवर्धन सहा. आयुक्त डॉ. मनीष बाविस्कर, पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश चोपडे, सहायक प्रफुल जोशी, किशोर जानवे यांच्या वैद्यकीय पथकाने या गायीची शर्तीचे प्रयत्न करून शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून तब्बल ५५ किलो प्लास्टिक बॅग, खिळा, एक एक रुपयाचे दोन नाणे बाहेर काढण्यात आले.

नागरिक भाजीपाला उर्वरित कचरा प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये टाकून फेकून देतात. जनावरे ही चारा समजून ती प्लास्टिक कॅरी बॅग खात असतात. याच प्रमाणे या गायीने देखील वर्षानुवर्षे अशा प्रकारचे प्लास्टिक खाल्याने तिच्या पोटात हे सर्व साचत गेले. आज तिच्या पोटात प्लास्टिक शिवाय काहीच नव्हते.

यामुळे तिला श्वास घेण्यासाठी त्रास होवू लागला होता. तिची पचनक्रिया बंद पडल्याने ती एकदम सुस्त पडलेली होती. नागरिकांनी भाजीपालाचा उर्वरित भाग प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये न टाकता केवळ कागदात किंवा असाच टाकून द्यावा असे आवाहन डॉ. मनीष बाविस्कर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.