सुवर्णसंधी.. रेल्वेत 10 वी पाससाठी 1000 हून अधिक पदांसाठी भरती

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नागपुरात अप्रेंटिस पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 1044 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागपूर विभागातील 980 पदे आणि मोतीबाग वर्कशॉप येथील 64 पदांचा समावेश आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार http://apprenticeshipindia.org या अधिकृत साइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्जाची महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख – 4 मे 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जून 2022

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावेत.

वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. असं अधिसुचनेत म्हटलंय.

निवड प्रक्रिया
गुणवत्तेच्या आधारावर या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. ज्या अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट http://secr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण तपशील ऑनलाइन तपासण्याचा सल्ला दिला जातो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.