खा. संजय राऊतांच्या वाढदिवसानिमित्त सदस्य नोंदणी अभियानास शुभारंभ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जळगाव महानगरतर्फे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला.

यावेळी शिवसेना जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, समन्वयक अंकुश कोळी, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, पियूष गांधी, उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, धरणगाव माजी नगरसेवक भागवत चौधरी, राजू ठाकरे, समन्वयक महेश ठाकूर, महानगर प्रमुख अमोल मोरे, विभाग प्रमुख विजय बांदल, संजय सांगळे, पुनम राजपूत, श्रीकांत आगळे, महीला आघाडीच्या मंगला बारी, गायत्री सोनवणे, नीलू इंगळे, शोएब खाटीक, मतीन सय्यद आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.