Saturday, January 28, 2023

धरणगावात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

हिवाळयाचे दिवस असून धरणगावातील नागरिकांना २२ ते २४ दिवसांपर्यंत पाणी मिळत नाहीय. तसेच गावात आरोग्याचे प्रश्नदेखील उद्भवत आहेत. पाणी समस्या व मुलभूत नागरी समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अन्यथा धरणगावकर नागरिक तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज शिवसेनेने (ठाकरे गट) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आम्ही कोणतेही बाबा म्हणायला तयार, पण धरणगावकरांना पाणी द्या, अशा शब्दात पालकमंत्र्यांवर टीका केली आहे. तर धरणगावचे मुख्याधिकारी कधी नव्हे ते आताच दबावाखाली काम करत असल्याचा आरोप माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केला आहे.

- Advertisement -

निवेदनात दिल्याप्रमाणे, धरणगाव शहरात गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून पाणी समस्येला नागरिक सामोरे जात आहेत. सध्या हिवाळ्याचे दिवस असून देखील नागरिकांना २२ ते २४ दिवसांपर्यंत पाणी मिळत नाही. पाणी समस्येमुळे धरणगावकर नागरिक अतिशय हैराण झालेले आहेत.  गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी लोकशाही पद्धतीने आंदोलने करून धरणगाव नगर परिषद प्रशासनाला झोपेतून जागे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु प्रशासन अतिशय ढिम्म असून पाणी समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.  धरणगाव शहरात इतर नागरी समस्या म्हणजे, घाणीचे साम्राज्य देखील झालेले असून नागरिकांचे आरोग्याचे प्रश्नदेखील उदभवत आहेत. धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी असूनदेखील ते कोणाच्या दबावाखाली काम करीत आहेत ते देखील कळत नाही.

सदर पाणी समस्या व मुलभूत नागरी सुविधांच्या समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अन्यथा धरणगावकर नागरिक तसेच शिवसेना  (उ. बा. ठा.) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, रमेश पाटील, शरद माळी, धीरेंद्र पुरभे, भागवत चौधरी, जितू न्हायदे, राजेंद्र ठाकरे, रवी जाधव, नागराज पाटील, पप्पू कंखरे, राहुल रोकडे, संतोष सोनवणे, विलास पवार यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित आहेत.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे