शिरसोली येथे १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे एका 17 तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूजा सुधाकर वनडोळे (बारी) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे पुजा वनडोळे ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. तरुणीचा भाऊ आणि आई कंपनीत कामाला गेले होते तर आजी शेतात गेली होती. त्यामुळे पुजा ही घरी एकटीच होती. याचवेळी पुजाने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान पुजाची आजी शेतातून घरी आल्या असता, त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे समजले. त्यांनी दरवाजा उघडताच त्यांना पुजा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. नातीचा मृतदेह बघताच आजीने टाहो फोडला.

यावेळी परिसरातील नागरिकांनी तात्कळ घटनास्थळी धाव घेत पुजाचा मृतदेह खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करीत मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तरुणीच्या पश्चात आई, भाऊ व आजी असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.