कुरंगीत घराच्या छतावरुन पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील कुरंगी येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा घराच्या छतावरुन पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुरंगी ता. पाचोरा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष चिंधा पाटील (४७) हे उन्हाळ्याचे दिवस असल्याने छतावर झोपले होते. २१ मे रोजी पहाटेच्या सुमारास अंदाज चुकल्याने अचानक त्यांचा पाय घसरून ते छतावरुन खाली पडले. दरम्यान या नंतर लागलीच सुभाष पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी सुभाष पाटील यांना मृत घोषित केले.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल भगवान बडगुजर हे करीत आहे. मयत सुभाष पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. यांच्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.