उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे पशु जनावर लाही लाही

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिरपूर:- तालुक्यात उन्हाळ्यातील तापमान आपल्या पासून कुणाला आवश्यक असणार्‍या तापमानापेक्षा खूप जास्त असते. जनावरांची तापमान सहन करण्याची पातळी ठरलेली असते. संकरित व विदेशी रक्तगट असणाऱ्या गाईसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस , देशी गाईसाठी  ३३ अंश सेल्सिअस, तर म्हशी साठी ३६ अंश सेल्सिअस ही तापमानाचे उच्च सहन पातळी आहे.

वातावरणातील तापमान वाढू लागले की जनावरे या वाढत्या तापमानाला जुळवून घेण्यासाठी धाम व श्वासाची गती वाढवून थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु एक वेळ अशी येते की जनावरे धाम व श्वासाची गतीद्वारे शरीर थंड ठेवू शकत नाहीत, त्यांच्या शरीराच्या तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते.

जनावरे उष्णतेच्या तानाला (हिट स्ट्रेस) बळी पडतात, याचा जनावरांच्या आरोग्यावर उत्पादनावर व प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो, संकरित व विदेशी रक्तगटाच्या गाई व देशी गाई पेक्षा उष्णतेच्या तानाला जास्त बळी पडतात, आपल्याला जर अशा काळातही चांगले उत्पादन घ्यावयाचे असल्यास जनावरांच्या व्यवस्थापनात वातावरणानुसार आवश्यक बदल करणे गरजेचे असते.

वाढत्या तापमानामुळे जनावरांना होणारे परिणाम

हवेतील उष्णता वाढत्यामुळे जनावरांच्या तापमानात देखील वाढ होते,त्यामुळे ही ऊर्जा उत्पन्नास हवी असते,ते शरीराचे तापमान संतुलित राखण्यास खर्च होते,परिणाम दूध उत्पादन ५० टक्के पर्यंत कमी होऊ शकते.

शरीराचे तापमान वाढते त्यामुळे जनावरांचे भूक कमी होवुन पाण्याची गरज वाढते,ती पूर्णपणे भागवली नाही तर शरीरातील पेशी मध्ये पाणी कमी होते,क्षारांचे शरीरातील प्रमाणही बदलते, त्यामुळे भूक मंदावते जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होवुन जनावरे इतर आजाराला बळी पडतात.

उष्णतेचा ताण कमी करण्याचा उपाय योजना

  • पाणी एका दुभत्या गाई ला उन्हाळ्यात १०० लिटर पेक्षा जास्त पाण्याची गरज असते.
  • वाढत्या उष्णतेमुळे शरिराचे तापमान सामान्य ठेवण्यासाठी धामाचा वेग वाढतो, त्यासाठी पाण्याची गरज असते.
  • उन्हाळ्यामध्ये जनावरांना चार ते पाच वेळा पाणी पाजावे किंवा शक्य असल्यास २४ तास उपलब्ध करावे.
  • पाणी पिण्याची जागा सावलीत व जनावराच्या जवळ असावी.

सुयोग्य निवारा

गोठ्याची रचना ही उष्णतेचा ताण कमी करणारी असावी गोठ्यातील तापमान १५ ते २५ अंश सेल्सिअस राखण्याचा प्रयत्न करावा,गोठा व परिसर थंड राहील याची काळजी घ्यावी.गोठ्यात जनावरांना बसण्यासाठी सावलीची भरपूर जागा उपलब्ध असावी. (४० ते ५० वर्ग फुट) गोठ्यात जनावरांची गर्दी करू नये, गोठ्याचे छत पत्र्याचे असतील तर त्याला बाहेरून पांढरा रंग लावावा,गोठ्याच्या छतावर गवत पाचट किंवा उपलब्ध तत्सम सामुग्रीचे सहा इंच जाडीचे अाच्छादन घ्यावे. जनावरांचे प्रखर सूर्यप्रकाश पासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या परिसरात झाडे व हिरवळ असावी.

आहार व्यवस्थापन  जनावरांच्या आहारात भरपूर हिरव्या चाऱ्याचा समावेश असावा, जनावरांना चारा हा वातावरण थंड असताना  सकाळी संध्याकाळी व रात्री घावा हिरवा चारा दुपारी घावा,उन्हाळ्यात शरीराची उर्जेची गरज मोठ्या प्रमाणात वाढते यासाठी आहारामध्ये ऊर्जा देणारे पदार्थ (धान्य,गूळ,मळी, तेलयुक्त, पेंड) तज्ञांच्या सल्ल्याने समाविष्ट करावे,उन्हाळ्यात खनिज मिश्रणाची मात्रा वाढवून घ्यावी. तसेच मीठ, खाण्याच्या सोड्याचा आहारामध्ये समावेश करावा.

जनावरांना थंड ठेवण्यासाठी करावयाचे उपाय योजना

सेट बंदिस्त असेल तर गरम हवा बाहेर जाण्यासाठी जागा असावी,गोठ्यात मोठे पंखे बसविल्या हवा खेळती राहील.गोठ्यातील वातावरण व जनावरे सुंदर राहण्यासाठी दर अर्धा तास आला २ ते ३ मिनिटे जनावरांच्या अंगावर पाण्याची फवारणी करावी पाण्याची फवारणी स्वयंचलित यंत्रणा बसवून फॉगर्स साह्याने किंवा हाताने करावी अशा गोठ्यात दमटपणा वाढू नये म्हणून पंखे चालू ठेवावेत.उष्णतेचा म्हशींना जास्त त्रास होतो. (घामग्रंथी कमी असणे आणि काळी व जाड कातडी) त्यासाठी म्हशींना पाण्यात डुबण्याची सोय करावी, २४ तास थंडा पाणी मुबलक प्रमाणात पिण्यास उपलब्ध असावे. अशी प्रतिक्रिया पशु जाणकार पियुष रेवतकर यांनी दै. लोकशाही ~ लोकलाईव्हशी बोलतांना दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.