शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विदया प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर परिषद Innovative Sustainable Practices in Science and Technology (ISPISAT 2022) या विषयावर आयोजित होणार असून सदर परिषदेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक व्ही. एल माहेश्वरी यांच्या शुभहस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे.

सदर उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी उपस्थित असतील. तसेच व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर परिषदेमध्ये एकूण 88 शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. डॉ. जेसन साज्रट हे “If Gandhiji was our computing Professor. What would he teach us?” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहे. अमेरिका स्थित डॉ. अखिल चौधरी यांचे “Study the effect of Light emitting diode on human cognition’ या विषयावर व्याख्यान होईल.

डॉ. राहुल कुलकर्णी यांचे “Effect of Professional Academic Networking with Linkedin” या विषयावर व्याख्यान होईल. देश विदेशातून विविध संशोधकांनी या परिषदेमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. ऑस्ट्रेलिया येथील 2 प्राध्यापक, 12 विदयार्थी सदर परिषदेत परिषदेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवणार आहे.

सदर परिषदेचा समारोप सायंकाळी 5.00 वाजता डॉ. जे. एन. चौधरी, प्रा. डॉ. एस. आर. चौधरी, गणित विभाग प्रमुख कबचौ उमवि जळगाव, प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.