शेळगाव धरणाचे सर्व दरवाजे बंद, पाणीसाठ्यास सुरुवात

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव, यावल, भुसावळ या क्षेत्रातील कष्टकरी बळीराजा अन् धरणीमातेचे ऋण फेडण्याचा ध्यास घेऊन तालुक्याचे माजी खासदार व आमदार स्व. हरिभाऊंनी अथक परिश्रम घेत जे शेतकरी हितासाठीचे कार्य केले.  त्यामुळे आज शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न खरोखर अवतरणार असल्याचे चित्र निर्माण झाले या स्वप्नपुर्तीच्या वाटचालीस सुरुवात होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

यावल तालुक्यासह संपुर्ण शेळगाव बॅरेजच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी वरदान असणारे शेळगाव धरणाचे आजपासुन सर्व दरवाजे बंद आतापर्यंत त्यात अंदाजे ३ घन मीटर पर्यंत पाणी साठा साठवण झाला आहे. शेळगाव धरणामध्ये पाणी साठा करून प्रस्तावित उपसा जलसिंचन प्रस्तावासाठी मान्यता द्यावी यासाठी अमोल हरीभाऊ जावळे यांनी निवेदनाद्वारे मागणी करीत प्रयत्न केले होते. त्यांनी यासाठी ग्रामविकास व आरोग्य शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे या संदर्भातील मागणी केली होती.

याच मागणीची दखल घेऊन शेळगाव धरणाचे सर्व दरवाजे आजपासून बंद करून त्यामध्ये आतापर्यंत अंदाजे ३ घन मीटरपर्यंत पाणी साठ्याची साठवण  धरणात करण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीषभाऊ महाजन यांचे मनस्वी आभार मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.