Shardiya Navratri 2021: पहिली माळ: नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलपुत्री देवी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आजपासून नवरात्राचे महापर्व सुरू झाले आहे. या नवरात्रीमध्ये नवदुर्गेच्या नऊरुपांचे नवरात्रात पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्याची पद्धत, परंपरा प्राचीन काळापासून  सुरू आहे.  आज नवरात्रातील पहिली माळ असून, नवदुर्गेचे प्रथम स्वरुप शैलपुत्री देवीला समर्पित आहे. शैलपुत्री देवीचे स्वरूप, महात्म्य यांविषयी जाणून घेऊया…

शैलपुत्री देवीचे स्वरुप:

शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्ध चंद्र स्थापित आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशुल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे. नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे. म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारुढा असेही संबोधले जाते. देवी सतीने हिमालय कन्येच्या रुपात जन्म घेतला. तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्र दोष नाहीसा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्या पार्वती, हेमवती, सती, भवानी इत्यादी नावानेही ओळखलं जातं. शैलपुत्री शब्दाचा अर्थ पहाडांची कन्या आहे.

शैलपुत्री देवीचा मंत्र:

दुर्गा देवीची षोडशोपचार पूजा केली जाते. शैलपुत्री देवीचे आवाहन सर्व नद्या, तीर्थ आणि दिशांनी केले जाते. संपूर्ण नवरात्रात दररोज घरात कापुरयुक्त धूप घालावा, असे सांगितले जाते.

या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:।

शैलपुत्री देवीसाठी नैवेद्य:

हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले गेले आहे. तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते, असे म्हटले जाते.

देवी शैलपुत्रीची पूजा विधी:

सकाळी स्नान करावं आणि या दिवशी देवी शैलपुत्रीच्या मूर्तीची पूजा करावी.  देवी शैलपुत्रीच्या मंत्रांचाही जप करावा आणि अखेर देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीची आरती करावी.

या दिवशी या मंत्राचा जप करावा:

या देवी सर्वभूतेषु मां शैलपुत्री रूपेण संस्थिता

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

ओम देवी शैलपुत्रायै नमः

सर्वस्वरूपे सर्वेशे, सर्व शक्ति समन्विते

भये भ्यास्त्राहि नो देवि, दुर्गे देवी नमोस्तुते

एतत् वदं सौमं लोचनं त्राहुशीतम्

पातु नः सर्वभूताभिः कात्यायनी नमोस्तुते

ज्वाला करला मत्युग्रामम् शेषासुर सुदणम्

त्रिशुलम पातु न भितर भद्रकाली नमोस्तुते

देवी शैलपुत्रीचा इतिहास; 

हिंदू पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीचा जन्म त्यांच्या पूर्व जन्मातील देवी सतीच्या रुपात झाला आणि त्यांनी पिता दक्ष प्रजापतीमुळे स्वत:ला निहाल करुन मृत्यूला त्यांनी कवटाळलं. एक दिवशी सतीच्या पितांनी सर्वांना एक भव्य यज्ञात आमंत्रित केलं पण त्यांनी भगवान शिवला फक्त त्यांचा अपमान करण्यासाठी आमंत्रण दिलं नाही. त्यामुळे देवी सतीने त्याच यज्ञात स्वत:ला भस्म केलं.

त्यानंतर त्यांनी पर्वत राजाची मुलगी पार्वती म्हणून जन्म घेतला आणि त्यांनी ध्यान केलं आणि प्रार्थना केली जेणेकरुन त्या भगवान शिवसोबत विवाह करु शकतील. ध्याननंतर, एक दिवस भगवान ब्रह्मा त्यांच्यापुढे प्रकट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की भगवान शिव त्यांच्याशी विवाह करतील.

शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या, शैल म्हणजे पर्वत, गिरी कन्या, अयगिरी नंदिनी पदात तीला शैलसुते म्हटलेले आहे. मनुष्य जीवनात त्याचे ध्येय, आकांक्षा, उच्च असतात, असाव्यात त्या उच्च ध्येयाप्रत पोहोचण्याचा मार्गही उंचच असतो. पहाड, पर्वताची चढण सोपी नसते. काटेकुटे, खाचखळगे, मोठमोठे दगडधोंडे, उंच सखल रस्ता पार केल्यावरच शिखर गाठता येते, तेव्हा त्या शैलपुत्रीचे म्हणजेच ध्येयाचे दर्शन होते. पहाड चढून गेल्यावर मातेचे जे दर्शन होते त्या दर्शनाने सर्व शिणवटा, थकावट दूर होऊन नेत्री ते अद्भुत रम्य, विलोभनीय रूप हृदयी वसते.

आनंदाला उधाण आलेले असते, भावना उचंबळून वाहू लागतात. धन्य झाल्यासारखे वाटू लागते. पहाड चढण्याच्या त्या परिश्रमाने एक अनामिक शक्ती तनामनाला व्यापू लागते आणि मग कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचे धाडस उपासकांत निर्माण होते. हाच तो ध्येयाबद्दलचा आत्मविश्वास, निर्भयता, कुठल्याही विपरीत परिस्थितीत अस्तित्व टिकवून ठेवण्याची  जी विशा, महत्त्वाकांक्षा याचेच दुसरे नाव जीवनाचे संरक्षित कवच होय.

Leave A Reply

Your email address will not be published.