सत्तेत सहभागी व्हा, मी राजीनामा देतो असे शरद पवार म्हणाले ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

0

 

रायगड ;- तुम्ही सत्तेत सहभागी व्हा मी राजीनामा देतो असे शरद पवार म्हणाले असल्याचा गौप्यस्फोट उमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केला.
अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात केलेल्या भाषणात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत भाष्य केलं आहे. यामध्ये अजित पवारांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केलं.

आपण स्वतःच राजीनामा देतो असंही ते म्हणाले असं अजित पवार म्हणाले. शरद पवार यांची सातत्याने धरसोडवृत्ती सुरू होती असं अजित पवार म्हणाले. विशेष म्हणजे देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुप्रिया सुळेंना ही बोलावून याची कल्पना देण्यात आली होती असा दावा अजित पवारांनी केला. पुस्तक प्रकाशन समारंभाच्या एक दिवस आधीच राजीनामा देण्याचा निर्णय झाला होता, असं अजित पवार म्हणाले. “१ मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही माहिती नाही. घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं. ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. १५ लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. तिथे वातावरण बदललं. ते घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली”, असं अजित पवारांनी नमूद केलं.

भाजपसोबत जाण्याचा 2 जुलैला आम्ही घेतलेला निर्णय मान्य नव्हता तर मग आम्हाला 17 जुलैला बोलावलं कशाला? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. पहिल्यांदा मंत्री या म्हणाले आणि त्यानंतर आमदार यांना घेऊन या म्हणाले. गाडी ट्रॅकवर होती मग काय झालं? आम्हाला गाफील का ठेवण्यात आलं? आम्हाला 12 ऑगस्टला पुण्यात एका व्यवसायिकाच्या घरी बोलावलं. मला बोलवलं म्हणून मी गेलो. मग सातत्यानं असं का करत आहात? असा सवाल अजित पवरांनी केला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.