सरकारचे अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष, शरद पवारांचे आरोप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे जळगाव आगमन झाले असून  त्यांचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच स्वाभिमानी सभेसाठी शरद पवार  जळगावात येत असल्याने त्यांचे भव्य पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शहरात शरद पवार यांच्या आगमन होताच तब्बल पाच जेसीबीच्या साह्याने भव्य पुष्पवृष्टी आणि तब्बल सहा क्विंटलचा भला मोठा हार घालून शरद पवार यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली.

 

काय म्हणाले शरद पवार 

– मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीब लोकांवर एक प्रकारे अन्याय होईल, त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवण्याची आवश्यकता

– राज्यात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज

– मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जवर फडणवीसांनी माफी मागितली म्हणजे आदेश त्यांनीच दिले होते, अशी एका प्रकारे त्यांनी कबुली दिली असून आता फडणवीसांनी राजीनामा द्यावा

– पंतप्रधानी राष्ट्रवादीवरील आरोपांची वस्तुस्थिती सांगावी. नसता असे आरोप करु नये

– अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या

– गावात पाण्याचा पुरेसा साठा नाही, त्यात लोड शेडींगची समस्या  चिंताजनक

–  शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष

–  पाऊस नसल्याने राज्याची स्थिती चिंताजनक, अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती

–  विमा कंपन्याच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने आशा निर्माण झाली होती. मात्र, आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाहीय

–  विमा कंपन्यांमुळे शेतकरी संकटात

– कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हवी तशी आवश्यक बाजारपेठ उपलब्ध नाही

Leave A Reply

Your email address will not be published.